प्राध्यापक युवतीवर अत्याचार ; सोशल मीडियावर दिले होते लग्नाचे आमिष ; तीन महिन्यांतर आरोपी अटकेत

क्राईम पाेलिस भुसावळ

भुसावळ प्रतिनिधी ::> अमरावती येथील मूळ रहिवासी असलेल्या तरुणीशी सोशल मीडियावर संशयिताने मैत्री केली. नंतर लग्नाचे आमिष देवून तिच्यावर अत्याचार केल्याने बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील पसार संशयित निश्‍चय बसंत पालिवाल (वय २६, रा.पिपरीया, ता.होशंगाबाद, मध्यप्रदेश) याला पोलिसांनी कणकवली (जि.सिंधूदुर्ग) येथून अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पीडीता जिल्ह्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयात लेक्चरर म्हणून काम करत होती. तर संशयित त्यावेळी मुक्ताईनगर तालुक्यातील एका धरणावर साईट इंजिनिअर म्हणून कामाला होता. संशयीताने प्राध्यापिका तरुणीशी ओळख वाढवत मैत्री केली, तसेच लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार केला. नंतर त्याने लग्न करण्यास नकार दिल्याने, युवतीने अमरावती पोलिसात ६ ऑगस्ट २०२० रोजी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित पसार झाला होता. अखेर तीन महिन्यांनी त्याचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. दरम्यानच्या काळात त्याची गोपनीय माहिती पोलिस काढत होते. गुन्ह्याचे कार्यक्षेत्र भुसावळ असल्याने हा गुन्हा बाजारपेठ पोलिसांत वर्ग करण्यात आला होता. संशयित कणकवलीत असल्याची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

प्राध्यापिका अमरावतीची व इंजिनिअर मध्यप्रदेशातील
गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीताचे लोकेशन कळत नव्हते. मात्र तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे साईट इंजिनिअर म्हणून कार्यरत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाली होती. त्यामुळे हवालदार जितेंद्र पाटील, रमण सुरळकर, चेतन ढाकणे यांनी कणकवली गाठून त्याला अटक केली.