३९ वर्षीय तरुणाची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या

आत्महत्या तापी भुसावळ

भुसावळ ::> तापी नदीच्या पुलावरून उडी घेत साकरी (ता.भुसावळ) येथील युवकाने सोमवारी दुपारी ३ वाजता आत्महत्या केली. संतोष भोळे (वय ३९) असे मृताचे नाव आहे. पुलावरून उडी घेताच नदीपात्रातील खडकावर आपटल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढला. शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.