धुळे शहरातील श्रद्धानगरात गळफासाने आत्महत्या

आत्महत्या क्राईम धुळे

धुळे ::>देवपुरातील श्रद्धानगरात राहणाऱ्या एकाने गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी हा प्रकार समाेर आला. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

नकाणेराेडला लागून श्रद्धानगर आहे. या ठिकाणी राहणारे राजेंद्र सुरेश अहिरराव ( वय ३८) यांनी राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता समोर आला. त्यांना अत्यवस्थ स्थितीत हिरे रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी प्रशांत पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *