२७ वर्षीय तरुणीची गळफास लावून आत्महत्या

Jalgaon आत्महत्या क्राईम जळगाव

“जीवनाला कंटाळले असून मी स्वत:हून आत्महत्या करीत आहे.”असे सुईसाईड नोट्स लिहीत केली आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी >> नोकरीनिमित्त जळगावातील रिंगरोड येथे राहणाऱ्या शोरूम मॅनेजर तरूणीने घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, प्रियंका मदन दास (वय-२७) रा. कवाळे नगर भुसावळ, ह.मु. रिंगरोड सिभागवाडी जळगाव ह्या पारितोष कमलाकर चौधरी यांच्या इलेक्ट्रिक स्कुटर शोरूममध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहेत.

प्रियंका ह्या सोमवारी कामावर आल्या नाहीत म्हणून सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शोरूममधील कामगार विजय गोकुळे परदेशी हा त्यांच्या घरी आला. दरवाजा आतून बंद होता. त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता प्रियंका दास यांनी पंख्याला साडीने गळफास घेतल्याचे लक्षात आले.

या घटनेची माहिती जिल्हा पेठ पोलीसांनी कळविल्यात आले. पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीसांना सुसाईड नोटस् आढळली. त्या म्हटले आहे की, “जीवनाला कंटाळले असून मी स्वत:हून आत्महत्या करीत आहे.”

याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि प्रदीप चांदेलकर करीत आहे.