साकळीचे सामाजिक कार्यकर्ते संतोष महाजन यांची माळी महासंघ यावल तालुकाध्यक्षपदी निवड

Social कट्टा कट्टा यावल साकळी

साकळी प्रतिनिधी ::> साकळी येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते संतोष महाजन यांची माळी महासंघ यावल तालुका अध्यक्ष पदी निवड झाली आहे. महाजन यांनी सांगितले की, मी केलेल्या विविध सामाजिक कामातून मिळालेलं फळ आहे. तसेच मला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसतांना हे कार्य माझ्या हाती सोपविले आहे. समाजाच्या हितासाठी प्रदेशाध्यक्ष यांनी दखल घेऊन ही जबाबदारी दिली आहे. गावातील सोशल मिडिया ग्रुप सह जाणकारांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील अनेक नेते मंडळीसह सामाजिक नेत्यांनीसुद्धा संतोष महाजन यांना शुभेच्छा दिल्या असल्याचे रिड जळगाव पोर्टलशी बोलतांना सांगितले. तसेच रिड जळगाव या पोर्टलचे रूपांतर वर्तमानपत्रात झाले पाहिजे अशी ही इच्छा रिड जळगाव च्या प्रतिनिधी शी बोलतांना बोलून दाखवली आहे. रिड जळगाव न्यूज पोर्टलकडून महाजन यांना हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा…!