एकनाथ खडसे सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार : भाजपा नेते राम शिंदे

Politicalकट्टा कट्टा

रिड जळगाव टीम ::> माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपला खूप मोठे खिंडार पडल्याचे दिसून येत आहे. यावर भाजपचे नेते राम शिंदे यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर जोरदार टीका केली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार असल्यानेच त्यांना राष्ट्रवादीने फोडलं, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केला आहे. अहमदनगरला कर्जत इथे ते पत्रकारांशी बोलत होते.या दरम्यान त्यांनी हे विधान केलं आहे.

70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीची (सक्तवसुली संचालनालय) चौकशी सुरु आहे. याप्रकरणी खडसे विरोधी पक्षनेते असताना ते प्रमुख साक्षीदार होते. त्यामुळे त्यातील साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे, असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.