शिवसेनेच्या भगव्यात भेसळ : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Politicalकट्टा कट्टा

नागपूर >> शिवसेनेच्या भगव्यात भेसळ झाली आहे. बाळासाहेबांचा भगवा खरा होता. आताचा भगवा बाळासाहेबांचा राहिलेला नाही, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे माध्यमांशी बोलताना केली.

फडणवीस म्हणाले, काश्मिरात चीनच्या मदतीने पुन्हा ३७० कलम आणू म्हणणाऱ्यांच्या व सावरकरांचा घाणेरड्या शब्दांत अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसली आहे.

गुपकार संघटनेत सहभागी असलेल्या काँग्रेसची साथ घेणाऱ्या शिवसेनेने आम्हाला हिंदुत्व सांगू नये, असेही त्यांनी सुनावले. फडणवीस पुढे म्हणाले, यांच्या (महाविकास आघाडी सरकार) आणि आमच्या काळातील वीज थकबाकीचा हिशेबच मांडला पाहिजे.