शिवसेनेचा 54वा वर्धापन दिन चाळीसगावात साजरा

Politicalकट्टा चाळीसगाव

चाळीसगांव (प्रतिनिधी) : अखंड महाराष्ट्रातील मराठी मनाची अस्मिता जपणारी संघटना असलेल्या शिवसेनेचा आज 54 वा वर्धापन दिवस असून शिवसेनेचा हा वर्धापन दिन चाळीसगाव शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने येथील घाट रोड वरील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आज सकाळी दहा वाजता शिवप्रतिमेचे व शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला यावेळी प्रथम भारत-चीन सीमेवर शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहून चीनचा या भ्याड कृत्याचा निषेध करण्यात आला सध्या कोरोना प्रादुर्भाव च्या पार्श्वभूमीवर मोजक्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा वर्धापन साजरा करण्यात आला असून शिवसेनेचे व ठाकरे सरकारची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहन यावेळी शिवसैनिकांना करण्यात आले सदर कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव खलाणे, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, माजी नगरसेवक संजय ठाकरे, एसटी कामगार सेनेचे रघुनाथ कोळी, शाखाप्रमुख रामेश्वर चौधरी, ज्येष्ठ शिवसैनिक प्रभाकर उगले, सुभाष राठोड, राजेंद्र भालेराव, दिनेश विसपुते, संदीप पाटील जावळे, बापू लेणेकर, दिलीप राठोड, सागर कोळी, पितांबर कोळी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *