दारूच्या नशेत युवकाची विहरीत उडी घेऊन आत्महत्या ; पोलिसांचा अंदाज

Jalgaon Jalgaon MIDC आत्महत्या जळगाव शिरसोली

जळगाव >> तालुक्यातील शिरसोली येथे एका युवकाने विहरीत उडी घेत आत्महत्या केली असून ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली असल्याचे बोलले जात आहे. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अस्कामात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, शिरसोली ता. जळगाव प्र.न. येथील रविंद्र यशवंत वाघ (वय ४०) यांनी सटवाई शेती शिवारातील भागवत रामदास बारी यांच्या शेतातील विहरीत शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उडी घेत आत्महत्या केली. ही घटना सालदाराच्या लक्षात आल्याने त्याने याबाबतची माहिती शेतमालक भागवत बारी यांना दिली. त्यांनी पोलीस पाटील यांना घटनेची माहिती देत घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, रविंद्र वाघ यांना दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेत त्यांनी विहरीत उडी घेवून आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तसेच गावकर्‍यांच्या मदतीने रविंद्र यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी सुमित्रा व मुलगा, मुलगी असा परिवार आहे.