शिरसोली प्रतिनिधी ::> आमदारकीपेक्षा ग्रामपंचायतीचे राजकारण हे अवघड असते. तथापि, ग्रामविकासाचा हा महत्वाचा पाया देखील असतो. कोविडमुळे एक वर्ष वाया गेले असले तरी चार वर्षात विकासाचा डोंगर उभा करणार असल्याची ग्वाही जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी दिली. तर गावातील जाणत्या लोकांनी एकत्र बसून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा. ही निवडणूक बिनविरोध झाली तर आपण गावाला २५ लाखांचा निधी देऊ असा शब्द पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिला.
राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचा महाआघाडी सरकार असल्याने तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना मी माझे शिवसैनिक आहे असे समजून गाव विकासाचे नियोजन करीत असल्याचे ना. पाटील यांनी स्पष्ट केले.