शिरसोली गावात ट्रकची दुचाकीस धडक, एक ठार तर दोघे गंभीर जखमी

Jalgaon अपघात जळगाव शिरसोली

शिरसोली जळगाव प्रतिनिधी ::> कंपनीतून काम करून घराकडे जाणाऱ्या ट्रिपलसीट दुचाकीस्वारांना शिरसोली गावात ट्रकने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. गुरुवारी रात्री ७.३० वाजता हा अपघात घडला.

भगवान धनराज चौधरी (वय ४७, रा. म्हसावद, ता.जळगाव) असे मृत प्रौढाचे नाव आहे. तर त्याचा लहान भाऊ प्रल्हाद धनराज चौधरी व कुंभार (रा. शिरसोली) हे दोघे जखमी झाले आहेत.

हे तिघे जैन कंपनीत ठेकेदारीत फ्रुट विभागात काम करतात. गुरुवारी कंपनीतून काम आटोपल्यानंतर तिघेजण दुचाकीने (एमएच-१९, डीई-२०२३) घराकडे निघाले होते.

या वेळी शिरसोली गावातील बारीनगरमध्ये त्यांच्या दुचाकीस समोरुन भरधाव येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिली. यात भगवान चौधरी यांच्या डोक्यास मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रल्हाद व कुंभार हे दोघे जखमी झाले.

दोघांना नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातस्थळी प्रचंड गर्दी झाल्यामुळे सुमारे एक तास वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान, जळगाव-पाचोरा मार्गाचे चौपदरीकरण सुरू असल्यामुळे वाहनधारकांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.