शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील बिजासन घाटात धावत्या ट्रकने घेतला पेट

Shirpur धुळे माझं खान्देश

शिरपूर ::> मुंबई-आग्रा महामार्गावरील बिजासन घाट पोलिस चौकीच्या समोर मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास चालत्या ट्रक ( ट्रेलर) ला अचानक आग लागली. आग ही त्याच्या केबिनमध्ये लागली होती.

चालकाने उडी मारून आपला जीव वाचवला. पोलिसांनी व स्थानिक लोकांनी पाणी टाकून सदर आग विझवली. या घटनेत ट्रक ( ट्रेलर) चे केबिन पूर्णपणे जळाले आहे.

या ट्रकमध्ये हार्वेस्टर मशीन होते. लवकर आग विझवली यामुळे आग जास्त पसरू शकली नाही.नाहीतर मागील हार्वेस्टर मशीनमध्ये ही आग लागली असती. एन एल ०१ एल ७२०८ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये अचानक आग लागली.

या ट्रकमधील चालक इरफान जकारिया हा हरियाणा येथील राहणारा आहे. पुण्याकडून जालंदर जात होता. यावेळी बिजासन घाट चढताना त्याच्या केबिनमध्ये ठेवलेल्या बॅटरीमध्ये ब्लास्ट झाला.

बॅटरीचे अॅसिड पसरल्याने आग पसरली. त्याने उडी मारून जीव वाचवला. यानंतर सदर ट्रक हा खांब्याला ठोकला गेला आणि थांबला स्थानिकांनी व पोलिसांनी पाणी टाकून सदर आग विझवली.