जेवताना घशात मटनाचा तुकडा अडकल्याने महिलेचा मृत्यू

अपघात क्राईम धुळे माझं खान्देश शिंदखेडा

धुळे शिदखेडा >> तालुक्यातील तावखेडा येथील महिलेचा घशात मटनाचा तुकडा अडकल्यामुळे मृत्यू झाला. यमुनाबाई पेंढारकर असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

तावखेडा येथील रहिवासी असलेल्या यमुनाबाई यशवंत पेंढारकर (वय ५५) यांनी रात्री मटन केले होते. जेवताना मटनाचा तुकडा त्यांच्या घशात अडकला. यामुळे त्यांना त्रास जाणवू लागला.

यानंतर पेंढारकर कुटुंबीयांनी त्यांना धुळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु प्रकृती अधिक बिघडल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने मुंबई येथील सायन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सुरुवातीपासून गंभीर होती.

उपचार सुरू असताना पहाटे सव्वापाच वाजता यमुनाबाई पेंढारकर यांचा मृत्यू झाला. घटनेबद्दल दोंडाईचा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.