शारदा विद्या मंदिर साकळी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !

Social कट्टा कट्टा यावल साकळी

साकळी ता. यावल प्रतिनिधी >> साकळी येथील शारदा विद्या मंदिर येथे आज दि. ६ डिसेंबर २०२० रविवारी रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री.जी.पी. बोरसे हे होते.

तर प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक एस. जे. पवार, आर.जे. महाजन, वाय. एस. सोनवणे, संतोष प्रभाकर निळे, हे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे प्राचार्य श्री जी. पी.बोरसे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी, कायदामंत्री, समता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, संविधानाचे जनक, लोकशाही, याविषयी माहिती दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आर महाजन यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, पर्यवेक्षक,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.