तारुण्यात भूकंपासारखी भयावहता असते : भगतसिंग

इंडिया कट्टा जगाच्या पाठीवर

तारुण्य म्हणजे मानवी जीवनाचा झरा. भगवंताने मानवाला प्रचंड शक्ती दिली आहे, ही शक्ती पाण्याच्या प्रवाहासारखी आहे. १६ ते २५ हे वय फार महत्त्वाचे आहे. या वयात हाडामांसाचे शरीर खूप काही करू शकते. ते जग जिंकू शकते. तारुण्य वसुंधरापेक्षाही खूप सुंदर आहे, त्यामध्ये भूकंपासारखी भीषणता भरली आहे. म्हणूनच तारुण्यामध्ये मनुष्यासाठी दोनच मार्ग असतात. एक म्हणजे तो प्रगतीच्या सर्वोच्च शिखरापर्यंत जाऊ शकतो नाहीतर अधोगतीच्या गडद खाईत पडू शकतो. त्याने ठरवले तर तो त्यागी होऊ शकतो, नाही तर विलासी होऊ शकतो, तो देवही बनू शकतो.

{जगात तरुणांचे साम्राज्य आहे. तरुणांच्या यशाचे जगाच्या इतिहासात दाखले आहेत. युवकच रणचंडीच्या कपाळाची रेषा आहे. ते महाभारताच्या भीष्मपर्वातील पहिल्या आव्हानांसारखे आहेत. तरुण मोठ्या मनाचे आहेत, त्यांना आजमावू शकता. एखाद्या आत्मत्यागी वीराची इच्छा असेल तर तरुणांना आवाज द्या. ते चंागले रसिकही आहेत. भावुकताही त्यांच्यामध्ये आहे. त्यांना काव्याचा छंद नसला तरी ते प्रतिभावंत कवी आहेत. ते चंागले कवी, चांगले लेखक आहेत. त्यांना भाषेचे चांगले ज्ञान नसले तरी ते उत्तम कवी आहेत. तरुण जगाचे उद्धारक आहेत…

{दैवी कौशल्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे तरुण. सायंकाळी ते नदीच्या काठावर तासनतास बसतात. डोंगरावर बसून मावळता सूर्य आपल्या नजरेने न्याहाळतात. त्या दिशेने येणाऱ्या संगीताच्या लाटेत मंद प्रवाहात तल्लीन होतात. खरंच विचित्र आहे त्यांचे जीवन… अद्भुत आहे त्यांचे धाडस. त्यांच्यात अफाट उत्साह आहे. त्यांनी ठरवले तर समाज आणि देशाचा उद्धार करू शकतात. देशाचा मान राखू शकतात, मोठमोठे साम्राज्य उलथवून टाकू शकता. ते या भव्य जगाच्या रंगभूमीचे पारंगत खेळाडू आहेत. आजचा तरुण उद्याच्या देशाचा भाग्यनिर्माता आहे. त्यांच्या हातात देशाचे भविष्य आहे.

आज भगतसिंगांची जयंती अाहे. ‘युवक’ शीर्षकाने हा लेख १९२५ मध्ये प्रकाशित झाला हाेता.

संदर्भ :: दैनिक दिव्य मराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *