सावदा येथील गुरांचा बाजार बंद, सुमारे ४० लाखांची उलाढाल ठप्प

रावेर शेती सावदा

सावदा >> येथे रविवारी भरणारा आठवडे बाजार तसेच गुरांचा बाजार रद्द करण्यात आला होता. मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी तीन दिवस आधी या संदर्भात शहरात दवंडी दिली होती.

रविवारी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी झाली. दोन्ही बाजार बंद असल्यामुळे सावद्यात आठवडे बाजारातून होणारी उलाढाल ठप्प होती.

एकही शेतकरी आणि व्यापारी बाजारात हजर नव्हता. आठवडे बाजार तसेच गुरांच्या बाजारातून होणारी ३५ ते ४० लाखांची उलाढाल थांबली, तसेच बाजार समितीचा महसूल बुडाला, असे बाजार समितीचे सचिव नितीन महाजन यांनी सांगितले.