अहवाल येण्यापूर्वीच रुग्णालयातून पलायन, सावद्यात गुन्हा दाखल

क्राईम सावदा

सावदा प्रतिनिधी : > येथील एक रुग्ण जळगाव येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. त्याचा स्वॅब नमुन्यांचा अहवाल येण्यापूर्वीच या रुग्णाने दवाखान्यातून पळ काढला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. या रुग्णाला पुन्हा जळगावला हलवण्यात आले. मात्र, या प्रकरणी पालिकेचे कर्मचारी अविनाश गवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रुग्णाविरोधात कलम १८८, २६९, २७० व आपत्तीव्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *