जळगाव,भुषण जाधव– दीनदयाल उपाध्ये यांच्या पुण्यतिथी निमित्य जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवाजी नगर मध्ये हमालवाड़ा परिसर, दवाखान्या मागील परिसर, केंद्र जवळील परिसर ,मिर्झा चौक ,जाफर चौक, बोहरीमज्जित मकरा आपारमेंट, अमर चौक, शिव मंदिर जवळ, राजवाडा जवळी. या सर्व परिसर च्या जवळील भागामध्ये कोरोना व डेंगू यांच्या संसर्ग होऊ नये याकरता आज नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या स्वखर्चाने प्रभागात कार्यकर्त्यांच्या सहकार्याने औषधी फवारणी करून घेतली. त्यावेळी संजय अकोलकर नाना गावडे व प्रभागातील नागरिक वर्ग उपस्थित होते. उद्या राहिलेल्या भागात औषधी फवारणी करणार असल्याचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी सांगितले.