साळसिंगी प्रतिनिधी ::> बोदवड तालुक्यातील साळसिंगी शिवारातून चाेरट्यांनी चार क्विंटल कापसाची चाेरी केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस अाले. या प्रकरणी येथील पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
साळशिंगी शेत शिवारात येथे सुभद्राबाई टिलू महाजन यांचे चार एकर शेत असून त्यांचा मुलगा निवृत्ती महाजन हा सर्व शेती सांभाळताे.
या शेतातून साेमवारी रात्री शेतात चाेरटे व वन्य प्राणी यांच्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी निवृत्ती महाजन हे शेजारील शेतकऱ्यांसह उपस्थित होते.
पण पहाटे ५ ते ८ वाजेदरम्यान चार क्विंटल कापसाची वेचणी करून अज्ञात चाेरट्यांनी ताे चाेरून नेला. सकाळी ९ वाजता शेतात गेल्यानंतर ही चाेरीची घटना उघडकीस अाली. चालू बाजार भावानुसार हा चार क्विंटल कापूस सोळा हजार रुपये किमतीचा आहे.
शेतकरी महाजन यांच्या फिर्यादी वरून येथील पोलिस ठाण्यात अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास पोलिस वसंत निकम करत आहे.