शिरागड ते साकळी १२ किमी पायीवारी करून आणली जाते अंखड ज्योत!

Social कट्टा कट्टा यावल साकळी

साकळी प्रतिनिधी ::> शिरागड येथील सप्तशृंगी देवी मंदिरातून शनिवार रोजी देवीची अखंड ज्योत आणून यावल तालुक्यातील साकळी येथील मुजुमदार नगरातील अष्टभुजा मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली.

शिरागड येथील श्री. निवाशीनी सप्तशृंगी मातेच्या मंदिरात जळणारी अखंड ज्योत साकळी येथील सार्वजनिक अष्टभुजा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी १२ किमी पायी जाऊन अंखड ज्योत आणली जाते. या मंडळाचे ४ वर्षापासून अखंड ज्योत आणण्याचा उपक्रम पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

दरवर्षी या मंडळातील सर्व पदाधिकारी भक्त जवळपास १२ किलोमीटर पायी जाऊन शिरागड येथून वाजत-गाजत व देवी मातेच्या जयघोषात अखंड ज्योत आणत असतात. या अखंड ज्योत मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते मयूर चौधरी, पंकज माळी, कृष्णा ओतारी यांच्यासह मंडळाचे अन्य भाविक मंडळी सहभागी झाले होते.