साकळीत महा राजस्व अभियानाद्वारे दाखले, मतदार ओळखपत्रांचे वाटप

Social कट्टा कट्टा यावल साकळी

साकळी प्रतिनिधी ::> कोरोना काळात गरजूंना आवश्यक दाखले, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र आदींचे लाभार्थींना घरपोच वितरण करण्यात आले. शासनाच्या महा राजस्व अभियानांतर्गत साकळी येथे राबवलेल्या या कार्यक्रमामुळे लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेकांना तालुक्यात या अभियानाद्वारे विविध दाखल्यांचे वितरणाचे काम सध्या सुरू आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाधिकारी शेखर तडवी यांनी केले. ते या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.

साकळी ता. यावल येथे नुकतेच महसूल विभागाकडून प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध दाखले, मतदार ओळखपत्र वितरण कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम साकळी येथील शारदा विद्या मंदिरामध्ये घेण्यात आला. साकळीसह चोपडा विधानसभा मतदार संघातील थोरगव्हाण येथील लाभार्थींना देखील मतदार ओळखपत्र वितरण करण्यात आले. शारदा विद्या मंदिर शाळेचे प्राचार्य बोरसे अध्यक्ष होते. तर मंडळाधिकारी शेखर तडवी, मूलचंद चौधरी, अनिल भालेराव, आसाराम पाटील, बेबाबाई झुरकाळे, महेंद्र हिरामण देवरे, नीलेश पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते.