साकळी ता.यावल (वार्ताहर) – येथील श्री स्वामी समर्थ ऍग्रो एजन्सीजचे संचालक अजय पाटील (पिळोदेकर) यांनी कोरोना विषाणू वैश्विक महामारी संकट लक्षात घेता साकळी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मागणी नुसार थेट शेताच्या बांधावर किटकनाशके व कॄषी मार्गदर्शन इत्यादी सेवा देणारा अभिनव उपक्रम सुरु केलेला आहे. या उपक्रमात शेतकरी बांधवांना सदर दुकानावर न जाता मोबाईल द्वारे विविध बियाणे यांची ऑर्डर बुक करून सदर दुकानदारांमार्फत बी-बियाणे व इतर संबंधित सुविधा श्री पाटील यांच्या मार्फत थेट शेताच्या बांधावर अथवा घरीच पोच दिली जाणार आहे.
सदरील उपक्रमास शेतकरी वर्गाकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनी आपण शेतीसाठी लागणारे कीटकनाशके सुद्धा थेट आपल्या घरी मागवून घेता येणार आहे. यासाठी तसेच राज्य सरकारचा आदेश आल्यावर बी बियाणे पण थेट शेतकऱ्या च्या घरी पोच करण्याची सुविधा सुरू करणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी सुरक्षित राहून काळजी घ्यावी. असे श्री.पाटील यांनी कळवले आहे.