साकळी येथे उद्यापासून उरुस, आज निघणार संदल

Featured Social कट्टा कट्टा यावल साकळी

साकळी प्रतिनिधी >> यावल तालुक्यातील साकळी येथील हजरत सजनशाह वली (रहे.) यांच्या उर्स सोहळ्यास रविवारपासून (दि.१०) सुरुवात होत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या उर्स सोहळ्यास शेकडो वर्षाची परंपरा आहे. संदल शरीफ यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने होणार आहे. पाच आठवडे चालणाऱ्या या उरूस शरीफमध्ये दर्गा परिसरात गर्दी न करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

प्राचीन काळी डांभूर्णी येथील राजपूत परिवारातील महिला राजवंतीबाईस हजरत सजनशाह वली(रहे.) बाबांनी बहिण मानून राखी बांधून घेतली. राखीची भेट म्हणून जमिनी दिल्या. तेव्हापासून परंपरेने या महिलेच्या परिवारातून आजही एकादशीला संदलनिमित्त सर्वप्रथम बाबांच्या मझारवर चादर चढवली जाते. हजरत सजनशाह वली(रहे.) यांचे नाव शाह अ.लतीफ (रहे.) असे आहे. ख्वाजा अजमेरी यांच्या सहकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते ते शेकडो वर्षांपूर्वी साकळी येथे आले. हा दर्गा चारही बाजूंनी पाहिल्यावर सारखाच दिसतो. दर्ग्याला लाकडाचा दरवाजा आहे. शनिवारी सायंकाळी संदल शरीफचा कार्यक्रम असून तो साधेपणाने पार पडणार आहे. तर रविवारी उर्स शरीफला प्रारंभ होत आहे.

पाच आठवडे उरुस सोहळा
पहिला उरुस सोहळा १ जानेवारी, दुसरा १७ जानेवारी, तिसरा २४ जानेवारी चौथा ३१ जानेवारी आणि शेवटचा उरुस शरीफ ७ फेब्रुवारीला साजरा होणार आहे. कोरोनामुळे दर्गा परिसरात फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हजरत सजनशाह वली(रहे.) यांचे नाव शाह अ.लतीफ (रहे.) असे आहे. ख्वाजा अजमेरी यांच्या सहकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते ते शेकडो वर्षांपूर्वी साकळी येथे आले. हा दर्गा चारही बाजूंनी पाहिल्यावर सारखाच दिसतो. दर्ग्याला लाकडाचा दरवाजा आहे. शनिवारी सायंकाळी संदल शरीफचा कार्यक्रम असून तो साधेपणाने पार पडणार आहे. तर रविवारी उर्स शरीफला प्रारंभ होत आहे.