साकळीत संविधान दिनाचा अवमान; ग्रामपंचायत प्रशासनाला पडला विसर, सरपंच-उपसरपंचांची अनुउपस्थिती!

Politicalकट्टा कट्टा निषेध यावल साकळी

साकळी प्रतिनिधी >> दि.२६ नोव्हेंबर २०२० रोजीच्या संविधान दिनाचा साकळी ग्रामपंचायतीला विसर का पडला याबाबत यावल पंचायत समितीला निवेदन देण्यात आले आहे. याबाबत चौकशी करुन जे दोषी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा उपोषणास बसेल अशी मागणी मिलिंद जंजाळे यांनी केली आहे.

निवेदनात म्हटल्या नुसार, संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा दि.२६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.

संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दि.२४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.

संपूर्ण भारत देशातील जनतेला न्याय,हक्क व कर्तव्याच्या जाणीनेतून मानवतेच्या भावनेने जगण्यासाठी प्रेरीत करणारा असा हा पवित्र ग्रंथ आहे.एवढे महत्व सांगणाऱ्या या संविधानाच्या गौरवार्थ व शासनाने घोषित केलेल्या दिवशी म्हणजे दिनांक दि.२६ नोव्हेंबर २०२० रोजी संविधान दिन साजरा करण्याचे शासनाने सुचित केलेले असतांना सुद्धा, साकळी ता. यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयाला संविधान दिन साजरा करण्याचा चक्क विसर पडलेला आहे.

यावल पंचायत समितीचे उप गटविकास अधिकारी यांना निवेदन देतांना मिलिंद जंजाळे

हा दिन दिलेल्या कुठल्याही नियमाने साजरा न करता या दिनाचा अवमान केलेला आहे. यादरम्यान आज दि.२६ नोव्हेंबर २०२० रोजी साकळी ग्रामपंचायतीची मासिक मीटिंग सुद्धा होती. तेव्हा या मीटिंग दरम्यान सुद्धा संविधान दिन साजरा करण्याचे कुठलेही औचित्य व शहाणपण संबंधित ग्रा.पं. प्रशासनाने दाखवले नव्हते. जेव्हा माझ्या लक्षात ही बाब आली तेव्हा मी स्वतः मासिक मीटिंग ठिकाणी जाऊन सरपंच, उपसरपंच,ग्राम विकास अधिकारी व उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांना एक सुज्ञ नागरिक म्हणून चांगलेच खडसावून विचारले की, आज सविधान दिन का साजरा केला नाही ? त्यावर मात्र सरपंचासह उपस्थितांपैकी कोणीही बोलले नाही. तेव्हा माझा संताप अनावर झाला व मी माझा संताप शिवसाळ भाषेतच व्यक्त केला.

त्यांना काय लाज वाटली जेव्हा मीटिंग संपली त्यानंतर अनेक पदाधिकारी यांनी घरचा रस्ता धरला.मात्र काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून ‘नावापुरताच ‘ व ‘ दिखाऊ ‘ पद्धतीने संविधान दिन साजरा केला.

कारण आजच्या रोजी प्रतिमा पूजन करून संविधान दिन वाचन व्हायला पाहिजे होते. मात्र तसे काही केलेले नाही तेव्हा एकूणच आज साकळी ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने संविधान दिन योग्य प्रकारे साजरा न करता या दिनाचा चक्क अवमानच केलेला आहे, तरी या प्रकाराची आपल्याकडून सखोल चौकशी होऊन उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांवर कठोरात -कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मागणी आहे.

अन्यथा माझ्या अर्जावर कुठलाही न्याय न मिळाल्यास मी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले.तरी माझ्या अर्जाची तात्काळ दखल व्हावी ही विनंती मिलिंद जंजाळे यांनी प्रशासनाला केली आहे.