चोपड्यात रोटरीने मनोरुग्ण वसतिगृहास भेट दिले १६ बेड, व्हीलचेअर!

Social कट्टा कट्टा चोपडा

राजेंद्र पाटील प्रतिनिधी चोपडा ::> येथील रोटरी क्लबच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि “जॉय ऑफ गिविंग’ या संकल्पनेंतर्गत रोटरी क्लबने तालुक्यातील वेले या गावातील ‘मानव सेवा तीर्थ केंद्राला १६ बेड, एक व्हीलचेअर, एक स्ट्रेचर असे साहित्य भेट दिले. या केंद्रात भटक्या मनोरुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार व संगोपन केले जाते. या सामाजिक संस्थेला रोटरी क्लबने मदतीचा हात दिला.

या वेळी रोटरीचे अध्यक्ष नितीन अहिरराव, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकल्प प्रमुख नितीन जैन, धीरज अग्रवाल, डॉ. पराग पाटील, संजीव गुजराथी, प्रफुल्ल गुजराथी, व्ही. एस. पाटील, एम. डब्ल्यू.पाटील, एल. एन. पाटील, चंद्रशेखर साखरे, विलास कोष्टी, ईश्वर सौंदानकर, पृथ्वीराज राजपूत, प्रदीप पाटील, शिरीष पालीवाल, महेंद्र बोरसे, विकेश निकम, मानव सेवा तीर्थचे व्यवस्थापक नरेंद्र पाटील व कर्मचारी उपस्थित होते. प्रकल्पास मुंबई येथील विजयी भव ही स्वयंसेवी संस्था व चोपडा येथील भारतीय जैन संघटनेचे सहकार्य मिळाले.