रिड जळगाव टीम ::> मराठा आरक्षणासंदर्भात उत्तर महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी रविवारी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र व राज्य सरकार आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत चर्चा करण्यात आली. उपस्थित सर्व खासदारांनी एकत्रितरित्या या लढ्याचे नेतृत्व खासदार छत्रपती संभाजीराजेंनी करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
खासदार छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेणाऱ्या खासदारांमध्ये अनुक्रमे उन्मेष पाटील, रक्षा खडसे, डॉ.सुजय विखे-पाटील, डॉ. प्रीतम मुंढे, डॉ. हिना गावित, डॉ.भारती पवार यांचा समावेश होता.
यावेळी झालेल्या चर्चेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या लढ्याचे कौतुक खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले. तसेच राज्य सरकारकडून पुढील काळात आरक्षणासंदर्भात योग्य वेळी भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.