धक्कादायक घटना रावेर तालुक्यात ४ भावंडांचा निर्घृण खून

क्राईम निषेध रावेर

रावेर प्रतिनिधी ::> रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील रोडवर एका शेतात ४ भावंडांचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली. या घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

रावेर येथून काही अंतरावर बोरगाव शेती शिवारात शेख मुस्ताक यांच्या शेतात मागील अनेक वर्षांपासून मयताब भिलाला हे आपल्या पत्नी आणि दोन मुली आणि तीन मुलांसोबत राहतात.

नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी पत्नी आणि मुलासह मध्यप्रदेशात १५ ऑक्टोबर रोजी गेले होते. तर बोरगाव येथे दोन मुले आणि दोन मुली हे घरीच होते.

आज सकाळी शेतमालक शेख मुस्ताक हे शेतात आल्यावर त्यांना घर बंद दिसले. त्यामुळे त्यांनी आवाज देत डोकावून पहिले असता, त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.

कारण घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर चारही भावंडांची कुऱ्हाडीने वार करत निर्घुण हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, रावेर पोलिसांनी तपासचक्र फिरवायला सुरुवात केली आहे.