थोरगव्हाण येथील सरकारी डॉक्टरला कोरोनाची बाधा

रावेर

रावेर : > तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात तालुक्यातील थोरगव्हाणच्या सरकारी रुग्णालयातील एका डॉक्टरसह मस्कावदसीम येथील ३० वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. थोरगव्हाण येथील सरकारी डॉक्टर सावद्यात आढळून आलेल्या पहिल्या कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आले होते. त्यांनी या महिलेवर उपचार केलेले असल्याने, यापूर्वी त्यांना क्वारंटाइन केले होते. मात्र त्यांचा अहवाल मंगळवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला.. तर मस्कावदसीम येथील रहिवासी असलेला ३० वर्षीय युवक पॉझिटिव्ह अाढळला अाहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *