रावेर तालुक्यातील ९५ गावांमध्ये पुन्हा कोरोनाच्या विरुद्ध अभियान राबवणार

Social कट्टा कट्टा रावेर

रावेर प्रतिनिधी ::> कोविड १९ संसर्गाचा प्रभाव सध्याला कमी झाला असला तरी रावेरसह तालुक्यातील ९५ खेड्यांमध्ये ५० वर्षाच्या वयस्कर तसेच वयोवृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. रावेर शहरासह ग्रामीण भागात कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यास संबधित आरोग्य पथकाकडून तपासून घेण्याचे अवाहन गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी केले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून रावेर तालुक्यातील ९५ गावांमध्ये पुन्हा कोरोनाच्या विरोधात अभियान चालवणार आहे. यामध्ये ५० वर्ष वयाच्या पुढच्या कमीत-कमी २०० नागरीकांच्या प्रत्येक गाव पातळीवर तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी पंचायत समिती प्रशासनाला तपासणीचे उद्दीष्ट देण्यात आले असून याची दखल घेत गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी आरोग्य प्रशासनाने नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे.

काय म्हणाले रावेर बीडीओ दिपाली कोतवाल ::> रावेर ग्रामीण भाग कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहे. तरी प्रत्येक नागरिकांनी दिवाळीत स्वता:ची काळजी घ्यावी. घरा बाहेर पडतांना मास्क लावला पाहिजे, कुठे ही वावरतांना फिजिकल डीस्टन्स ठेवावे व प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावे असे आवाहन गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी केले आहे.