नंदुरबार ::> तालुक्यातील वाघोदा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला नराधमाला फाशी देण्यात यावी, अशी मागणी टायगर ग्रुपने केली आहे. याविषयी पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
याविषयी टायर ग्रुपचे सदस्य आदित्य मनोज डोडवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,वाघोदा येथील अल्पवयीन मुलीवर ३१ ऑगस्टला एका नराधमाने बलात्कार केला. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे.
याप्रकरणी संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोषीला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी विनीत साठे, मयूर मराठे, देवा पानपाटील, शुभम कुवर, हेमंत पाटील, ऋषीकेश भांडारकर, टायगर ग्रुपचे संस्थापक जालिंदर जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव आदींनी केली आहे.