चाळीसगाव तालुक्यात बिलाखेड येथे ८ वर्षीय चिमुकलीवर चुलत भावानेच केला अत्याचार ; नात्याला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना

क्राईम चाळीसगाव निषेध

चाळीसगांव प्रतिनिधी ::> तालुक्यातील बिलाखेड येथील अल्पवयीन चिमुकलीवर नातेवाईकाकडूनच अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. या घटनेने नात्याला कलंकित घोषित केले असून चाळीसगाव तालुक्यासह जिल्ह्यात अविश्वासाची दरी निर्माण झाल्याने खळबळ उडाली आहे. दि. 18 रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास चिमुकलीचे आई वडील घरी नसतांना मुलीचे अपहरण करून व तिला अज्ञात जागी नेऊन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला. तालुक्यातील आरोपी गोरख सोनवणे वय २२ रा. बिलाखेड या नराधमाच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये पोस्को अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे हे करत आहेत.