हावडा-मुंबई मेल, हावडा एक्स्प्रेस दररोज धावणार ; भुसावळ, जळगावात थांबा!

जळगाव तापी भुसावळ

रिड जळगाव टीम ::> नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे प्रशासनाने हावडा मुंबई मेल व हावडा अहमदाबाद एक्स्प्रेस या गाड्या आठवड्यातून तीन दिवस सुरु केल्या होत्या. मात्र आता रेल्वे प्रशासनाकडून या गाड्या दररोज सोडल्या जाणार आहेत.

रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता हावडा-मुंबई मेल आणि हावडा-अमदाबाद या विशेष गाड्या आठवड्यातू तीन दिवस धावत होत्या. मात्र या गाड्या आता प्रवाशांच्या सोईसाठी दररोज धावणार आहेत, असे रेल्वेकडून सांगितले.

(०२८१०) अप हावडा-मुंबई मेल विशेष गाडी ही हावडा स्टेशनवरून ६ ऑक्टोबरपासून दररोज धावणार आहे. तसेच गाडी क्रमांक ०२८०९ डाऊन मुंबई-हावडा मेल ८ ऑक्टोबरपासून दररोज धावेल.

भुसावळ, जळगावात थांबा!
गाडी क्रमांक ०२८३४ अप हावडा-अहमदाबाद विशेष गाडी ७ ऑक्टोबरपासून, तर ०२८३३ डाऊन अहमदाबाद – हावडा विशेष गाडी १० ऑक्टोबरपासून दररोज धावणार आहे. या गाडीला जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, जळंब, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर येथे थांबा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *