नागपूर-मुंबई, विदर्भ उद्यापासून धावणार तर भुसावळात थांबा निश्चित

तापी रिड जळगाव टीम सिटी न्यूज

भुसावळ प्रतिनिधी :: अनलॉक पाचमध्ये आता नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस व मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस या गाड्यांची सेवा शुक्रवारपासून (दि.९)सुरु होणार आहे. गुरूवारी (दि. ८) सकाळी ८ वाजेपासून सुरू केले जात आहे.

भुसावळ विभागातून सुमारे ५० पेक्षा जास्त गाड्या सुरू झाल्या आहेत. त्यात आता पुन्हा अप आणि डाऊन चार गाड्यांची भर पडणार आहे. शुक्रवारपासून (दि.९) मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस आणि नागपूर -मुंबई दुरांतो एक्स्प्रेस या गाड्या सुरू होत आहे. तर शनिवारपासून अप विदर्भ एक्स्प्रेस व मुंबई –नागपूर दुरंतो एक्सप्रेस धावणार आहे. दुरंतो एक्स्प्रेस भुसावळला थांबणार असून, विदर्भ एक्स्प्रेसचे थांबे पूर्वीप्रमाणे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *