किनगावचा राहुल पाटील सैन्यात लेफ्टनंटपदी नियुक्त ; यावल तालुक्याचा अभिमान वाढला !

Social कट्टा कट्टा किनगाव पाेलिस यावल

किनगाव प्रतिनिधी >> यावल तालुक्यातील किनगाव येथील राहुल अरुण पाटील या तरुणाची सैन्यात अधिकारी म्हणून गोरखा रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. सैन्यदलात प्रथमच एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याचा बहुमान किनगावातील राहुल पाटील यांना मिळाला आहे.

किनगाव येथील रहिवासी राहुल पाटील हा मध्यमवर्गीय परिवारातील आहे. लहानपणापासूनच अधिकारी व्हायचे त्याचे स्वप्न होते. सेवेत असताना त्याने सैन्यदलातील विविध परीक्षांसह प्रशिक्षण पूर्ण केले. नुकतेच चेन्नई येथे झालेल्या दीक्षांत समारंभात त्यांच्या खांद्यावर स्टार लावण्यात आले. त्यास गोरखा रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट पदावर नियुक्ती देण्यात आली.

लेफ्टनंट राहुल पाटील यांनी दीक्षांत समारोहामध्ये आपल्याला संस्कारक्षम शिक्षण देत घडवणाऱ्या आई रंजना पाटील व वडील अरुण मुरलीधर पाटील यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण या पदापर्यंत पोहोचलो. देशसेवा करण्याचे स्वप्न साकार झाले, असे सांगितले. दरम्यान, त्यांच्या या पदावर नियुक्तीबद्दल परिसरातील अनेकांनी कौतुक केले.