प्रत्येक ग्रामपंचायतला भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक, युवा सैनिकांनी सज्ज रहावे : गुलाबराव पाटील

Politicalकट्टा कट्टा धरणगाव निवडणूक

धरणगाव >> आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींमधील अधिकाधिक जागा जिंकून भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक व युवा सैनिकांनी सज्ज रहावे. तर अधिकाधिक ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जागृत राहावे, असे आवाहन शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी केले. येथील जी. एस. लॉन येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

धरणगाव तालुक्यातील ७० ग्राम पंचायतींपैकी तब्बल ४७ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक होत आहे. एकूण १५१ वार्डातून ४०३ ग्रामपंचायत सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. त्यात तब्बल २२५ महिलांसाठी (५६ टक्के) जागा राखीव आहेत.

महिलांचा निवडणुकीत दिसणार प्रभाव …
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ४०६ ग्रामपंचायत सदस्यांपैकी तब्बल २२५ म्हणजे ५६ टक्के महिला निवडून येणार असल्याने महिलांचा प्रभाव ग्रामपंचायतीवर दिसणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या महिलांना निवडणुकीत उभे करावे. सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घ्यावी, अशा सूचनाही मंत्री पाटील यांनी केल्या.