जिल्ह्यातील वाहतूक पोलिसाला चक्क 800 रुपयांची लाच भोवली !

क्राईम चाळीसगाव

रीड जळगाव टीम >> चाळीसगावातील कॅप्टन कॉर्नर येथून मारोती ओमनी वाहनात प्रवासी भरुन प्रवासी वाहतूक करत होते. यादरम्यान पोलीस नाईक आबा पाटील यांनी तक्रारदारास मागील व चालू महिन्याचे असे एकूण 800 द्यावे लागतील असे सांगितले. व पैसे दिले नाही तर प्रवासी वाहतूक करु देणार नाही, तसेच वाहनावर कारवाई करेन असे सांगितले. त्यानुसार याबाबत तक्रारदार याने 31 मार्च 2016 रोजी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला. तसेच पंटर मोहन गुजर यांच्यासह पोलीस नाईक आबा पाटील यास रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक करण्याच्या मोबदल्यात पंटरमार्फत 800 रूपयांची लाच घेणार्‍या वाहतूक पोलीस नाईक आबासाहेब भास्कर पाटील (वय-44) याच्यासह पंटर मोहन भिका गुजर (वय-54) या दोघांना चार वर्ष सक्त मजुरी व प्रत्येकी चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जळगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्या. पी.वाय.लाडेकर यांनी सोमवारी हा निकाल दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *