पातोंडा येथे मृत माकडावर वाजतगाजत अंत्यसंस्कार

Social कट्टा अमळनेर कट्टा

अमळनेर >> हनुमानाचे प्रतिरूप व माणसाप्रमाणे वावर असलेले तसेच आपण वानरांचे वंशज आहोत. या उद्देशाने येथिल ग्रामस्थांनी मृत्यू पावलेल्या एका वानराची (माकडाची) अंत्ययात्रा मानवाच्या विधिवत अंत्ययात्रे प्रमाणे वाजतगाजत दि.२६ च्या सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान काढली. अंत्ययात्रेस बहुसंख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

सविस्तर की येथे गेल्या सातआठ दिवसापासून दोन ते तीन माकड गावात आले होते. सदर दोन माकड श्री दत्त मंदिरच्या एका पडक्या घराला लागून असलेल्या पिंपळाच्या झाडावरच होते. अचानक दोन्ही माकड दिसेनासे झाले.

दत्त मंदिर परिसरात अत्यन्त दुर्गंधी येत असल्याने तापासाअंती एक माकड दत्त मंदिरच्या मागील बाजूस असलेल्या पडक्या घरातील पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याशी मृतावस्थेत आढळून आले. मृत वानराबाबत अनेक धार्मिक व श्रद्धेच्या भावना ग्रामस्थांन मधून व्यक्त होत होत्या.

ग्रामस्थानीं लागलीच निर्णय घेऊन मृत वानराचा अंत्यसंस्कार माणसा प्रमाणे करण्याचे ठरविले. त्या प्रमाणे बोळवण सामान, कापड, डोली, फुलहार, पूजासाहित्य, वाजंत्री यांची तयारी केली. वाजतगाजत गाव दरवाज्यातून अंत्ययात्रा काढली.

विकास मंचच्या ध्यान केंद्र आवारात वानराची दफनविधी करण्यात आला. प्रल्हाद पाटील यांनी आग्या होऊन मुंडन केले. आदी ग्रामस्थानीं खांद्या लावला. त्याच बरोबर मृत माणसांना मोक्ष मिळावा या हेतूने जसा समाजात दहाव्या दिवशी दहावे करून मुंडन तसेच गंधमुक्त व इतर पुजा विधी केले जातात त्याप्रमाणे दि. ५ डिसेंबर रोजी शनिवारी येथिल जागरूक देवस्थान श्री दक्षिणीमुखी हनुमान मंदिर चौकात गावातुन वर्गणी जमवून विधी पूर्ण केले जाणार आहेत.

मृत वानराची खबर फॉरेस्ट खात्याला देण्यात आली. त्यानुसार फारेस्ट कर्मचारी समाधान पाटील व मयुर पाटील यांनी वानरचा मृतदेह काढला व पाहणी केली. या कामी प्रतिष्ठित व्यक्ती व तरुणांचे अनमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
गजानन पाटील अमळनेर✍