पारोळ्यातील २४ वर्षीय तरुण विवाहितेची आत्महत्या

क्राईम पारोळा

पारोळा ::> येथील के. आर. नगरमधील २४ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना १८ रोजी दुपारी घडली. याबाबत मुरलीधर मुकुंदा वाणी यांनी पारोळा पोलिसांत खबर दिली कि, धनश्री योगेश शेंडे (वय २४) या विवाहितेने राहत्या घरी १८ सप्टेंबरला दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास गळफास लावून घेतला. ही घटना कळाल्यानंतर नातेवाइकांनी धनश्रीला कुटीर रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी तपासून दुपारी १.३० वाजता धनश्री शेंडे यांना मृत घोषित केले. पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. विवाहितेचे माहेर सटाणा येथील असून २ वर्षांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेच्या आत्महत्येचे कारण मात्र समजून आले नाही. तपास हवालदार किशोर पाटील करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *