पारोळा येथील तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरूद्ध गुन्हा झाला दाखल

आत्महत्या क्राईम पारोळा

पारोळा >> शहरातील हवालदार मोहल्ला भागात १ डिसेंबरला २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी घराशेजारील ६ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला.

कलिमउल्ला हबीब उल्ला पठाण (रा.नवापूर) यांनी फिर्याद दिली. त्यात पारोळा येथील त्यांचा चुलत भाऊ मोहसीन करीम पठाण यास शेजारी तौसिफ शेख यासिन, नजीम शेख यासीन, अजीस शेख अलीम, सलीम शेख भैय्या, यासिन शेख भैय्या, फ्यूज शेख सलीम (सर्व रा.पारोळा) हे त्रास देत होते. याप्रकरणी ३० नोव्हेंबर रोजी संबंधितांविरुद्ध तक्रार देण्यात आली होती. त्याचा राग येऊन संशयितांनी पुन्हा वाद घालत दमदाटी केली.