डॉक्टरने केला १५ लाखांसाठी पत्नीचा छळ

निषेध पारोळा

पारोळा प्रतिनिधी ::> नवीन हॉस्पिटल सुरू करण्यासाठी माहेरहून १५ लाख रुपये आणावे, या मागणीसाठी डॉक्टरने पत्नीचा छळ केला. याप्रकरणी शिरसमणी (ता.पारोळा) येथील माहेर असलेल्या विवाहितेच्या तक्रारीनुसार डोंबिवली येथील डॉक्टर पतीसह तीन जणांविरुद्ध पारोळ्यात गुन्हा दाखल झाला.

अमृता भगवान पाटील यांचे काही दिवसांपूर्वी डोंबिवली (जि.ठाणे) येथील डॉ.विनोद लक्ष्मण गपाट यांच्याशी विवाह झाला. तेव्हापासून तिच्या पतीसह मनोज गपाट (जेठ), धनोज गपाट (जेठ), रुख्मिणी गपाट (सासू, सर्व रा.पलावा, डोंबविली) यांनी घणसोली येथे नवीन हॉस्पिटल सुरू करण्यासाठी माहेरहून १५ लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. अमृता यांनी नकार दिल्याने मानसिक व शारीरिक छळ व मारहाण केली. यानंतर विवाहितेस घराबाहेर हाकलून लावले. याप्रकरणी अमृता पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला.