महिलेचा विनयभंग, मारहाणप्रकरणी पारोळा येथे दोघांवर गुन्हा

क्राईम पारोळा

पाराेळा ::> येथील राजीव गांधी नगरमधील पीडित महिलेल्या शेजारी राहणाऱ्या बापू कश्यप व ज्याेती कश्यप यांचा अवैध गावठी दारु विक्रीचा व्यवसाय अाहे. या संदर्भात पीडित महिलेने पाेलिसांत तक्रार केली हाेती. मात्र, कारवाई तर झालीच नाही. परंतु, पीडित महिला व तिच्या पतीला या दाेघांनी मारहाण करुन पीडित महिलेचा विनयभंग केला. पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन दाेघांवर गुन्हा नाेंद झाला अाहे. तपास प्रकाश चाैधरी करत अाहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *