३ लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ, ६ जणांवर गुन्हा दाखल

क्राईम पारोळा

पारोळा >> तालुक्यातील शिरसोदे येथील माहेर, तर विरार (ता.वसई) येथील सासर असलेल्या विवाहितेचा रिक्षा घेण्यासाठी माहेरातून ३ लाख रुपये आणावे यासाठी सासरी छळ झाला. अंगावरील सोने-चोदींचे दागिने काढून घेत छळ केला. ठार मारण्याची धमकी देत तीन वेळा तलाक असे म्हणत गैर कायद्याने तलाक दिला. याप्रकरणी सासरकडील जावेद शेख, अफरोजबी युनूस शेख, युनूस युसूफ शेख, अजीम युनूस शेख, तबरेज युनूस शेख, पापा युनूस शेख यांचेवर गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करत आहेत.