सोमवारी जिल्ह्यातील या शहरात पाळला जाणार जनता कर्फ्यू

पारोळा रिड जळगाव टीम

पारोळा प्रतिनिधी >> जिल्ह्यात सध्याला कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. जळगाव सह जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पारोळा तहसिल कार्यालयात येथे बैठकीचे आयोजन करण्यात येऊन सोमवारी जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आ. चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव पुन्हा वाढु नये म्हणुन मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करणे, व्यापाऱ्यांनी मास्क न घालणाऱ्यांना दुकानात प्रवेश देवु नये अशा ठोस उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. तसेच सर्वानुमते सोमवारी जनता कर्फ्युचे आयोजन व मास्क न वापरणाऱ्यांवर २०० रूपये दंड आकारण्यात यावा असे निर्णय घेण्यात आले.