पारोळ्यात ५ लाखांसाठी विवाहितेचा छळ, १२ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

क्राईम पारोळा

प्रतिनिधी पारोळा >> कार घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणावे, या मागणीसाठी येथील सासर असलेल्या विवाहितेचा छळ झाला. याप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात सासरकडील १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

आफरीनबी शेख अल्ताफ मणियार हिने फिर्याद दिली. त्यात २५ जानेवारी २०२० ते ३ जानेवारी २०२१ दरम्यान वेगवेगळ्या कारणांवरून सासरकडील मंडळींनी वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला.

कार घेण्यासाठी माहेरहून ५ लाख आणण्याची मागणी केली. अन्यथा तलाक देण्याची धमकी दिली. याप्रकरणी शेख अल्ताफ शेख उस्मान मनीयार, शेख उस्मान शेख अब्दुला मनीयार, जरीनाबी उस्मान मनीयार, मोहसीनबी शेख इस्तियाक मनियार, फरजानबी शेख अश्फाक मनीयार, शेख ईस्तीफाक शेख आदींविरूद्ध गुन्हा दाखल झाला.