दोन्ही भावांनी केला २३ वर्षीय विवाहितेचा विनयभंग

क्राईम पारोळा

पारोळा प्रतिनिधी >> तरवाडे येथील २३ वर्षीय विवाहितेचा दोन चुलत दिरांनी विनयभंग केला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी झालेल्या वादात एक जण जखमी झाला आहे.

२८ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता विवाहिता शेतातून घरी येत होती. त्यावेळी चुलत दीर मंगेश बुधा भराडी, संजय बुधा भराडी यांनी तिला रस्त्यावर अडवून विनयभंग केला. लज्जास्पद कृत्य केले. यामुळे विवाहिता घटनास्थळावरून निघून गेली.

झालेल्या प्रकाराबाबत तिने पती, चुलत सासऱ्यास माहिती दिली. नातेवाईक असल्याने पती व चुलत सासरे गुलाब जोगी हे त्यांना समजावण्यासाठी सोमवारी सकाळी ८ वाजता गेले होते. त्याचे वाईट वाटून त्या दोघांनी पीडितेचा पती व चुलत सासऱ्यास दमदाटी केली. चुलत सासऱ्याच्या डोक्यात लाकडी दांडा मारून जखमी केले.