पारोळा : जिराळी येथे १८ वर्षीय तरुणाची आत्महत्या

क्राईम पारोळा

पारोळा ::> तालुक्यातील जिराळी येथे तरुणाने १८ रोजी दुपारी १.३० वाजता राहत्या घरी विषारी पदार्थ सेवन केले हाेते. धुळे येथे उपचारादरम्यान या तरुणाचा रात्री उशिरा मृत्यू झाला. याबाबत धुळे जिल्ह्यातील बिलाडी येथील अधिकार चांगदेव पाटील यांनी पारोळा पोलिसांत १९ रोजी खबर दिल्यावरुन नाेंद करण्यात अाली अाहे. जिराळी येथील समाधान चांगदेव पाटील (वय १८) असे मृत तरुणाने नाव अाहे. मजुरी करणाऱ्या पाटील यांच्या आत्महत्येचे कारण समजले नाही. तपास हेड काॅन्स्टेबल इक्बाल शेख करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *