खडसे राष्ट्रवादीत गेले, पंकजांनी शिवसेनेत यावे : गुलाबराव पाटील

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

जळगाव ::> स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये मैत्रीचे नाते होते. या दोघांमुळे राज्यात भाजप-शिवसेनेची युती उभी राहिली होती. त्यांच्यानंतरही शिवसेनेने मुंडे कुटुंबाशी असलेले ऋणानुबंध कायम ठेवले आहेत. खासदार प्रितम मुंढे यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे आता माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावे, असे जाहीर निमंत्रण जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना माध्यामांशी बोलताना दिले. एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेले आहेत. आता पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत आले पाहिजे. मुंडे कुटुंब आणि शिवसेनेची जवळीक असल्याने त्या शिवसेनेत येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.