जामनेर तालुक्यातील पहूर येथे बस स्टण्ड समोर गर्दी

जामनेर पहूर सिटी न्यूज

जामनेर > पहुर बाजार पेठेचे गाव असून या गावाच्या आजू बाजू 15 खेडे लागुन असलेल्या या पहुर बस स्टॅण्ड जवळ लॉक डाऊनच्या काळात रोज गर्दी दिसत आहे. पोलीस प्रशासन मात्र कोणतीही कडक कारवाई करत नसल्याचे समजत आहे जो पर्यंत पोलीस कडक कारवाई करत नाही तो पर्यंत असंच दृश्य पहायला मिळेल असे समजते काही लोक विनाकारण घराबाहेर येऊन बस स्टण्ड परिसरात मनमोकळे पणाने बाहेर पडत आहे. सकाळी अकरा ते सायंकाळचे पाच वाजेपर्यंत दुकानांची वेळ पोलिसांनी दिली असून, दुकाने सकाळी 10 वाजता सुरू होऊन संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहत आहे, तसेच काही वाहने सुरू झाले असुन त्यात काही अॉटो, रिंक्क्षा सुरु आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांना ची संख्या 232 झाली असुन तालुक्यातील सर्व गाव परिपुर्ण 100 टक्के बंद करण्यात आले पाहिजे जेणे करून विनाकारण घराबाहेर पडणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *