पहूर येथे सट्टा पत्ता दारूचा महापूर; अवैध धंदे जोमात सुरू

क्राईम जामनेर

पहुर पोलिसांचे दुर्लक्ष, हप्तेखोरीमुळे अवैध धंदे चालकांना अभय ; नागरिकांमध्ये दबता सूर

पहुर प्रतिनिधी >> जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस ठाणे अंतर्गत पहूर सह सर्व गावात सट्टा पत्ता गावठी दारू जोरात सुरू असून संचारबंदी काळात सुद्धा अवैध धंदे पुन्हा सूरू झाले आहेत. याबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. मोठ्या धडक कारवाई न करता पहुर पोलिसांकडून अभय देण्यात येत आहे. तसेच हप्ते खोरी मुळे मोठ्या अवैध धंदे चालकांवर कारवाई न करता त्यांना अभय देण्यात येत आहे.

संचारबंदी काळातही अवैध धंदे सुरू असल्याने पवार पोलीस दुर्लक्ष होत असून या धंद्यांवर कारवाई करून बंद करण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे. पहूर पोलिस ठाणे अंतर्गत पहूर शेंदुर्णी तोंडापूर फत्तेपुर वाकडी शेंगोळा पाळधी आधी मोठ्या गावात क नावाचा जुगार अड्डा जोरात सुरू असून गावाच्या मुख्य चौकात तसेच बस स्टँड परिसरात सट्टा पेढी खुलेआम सुरू असून काही भागात गावठी दारू सुद्धा मिळत असल्याने गावांमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

पहूर पोलिस ठाणे अंतर्गत रोज नवीन नवीन भांडणे उपलब्ध होत आहे. अवैध धंदे चालकांवर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश परदेशी ही कारवाई का करत नाही ? या अवैध धंदे चालकांवर धडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना विभाग प्रमुख तथा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश पांढरे यांनी महाराष्ट्र राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *