यावल प्रतिनिधी >> मधमाश्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ५२ वर्षीय शेतकऱ्याचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. भागवत भास्कर काठोके (रा.पाडळसे, ता.यावल) असे मृताचे नाव आहे.
काठोके हे अल्पभूधारक शेतकरी असून जोडधंदा म्हणून ते दुग्ध व्यवसाय करत होते. ११ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी शेतामध्ये ते गाई चारायला गेले होते. दुपारी ३ वाजता त्यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला.
या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी भुसावळ येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, रविवारी त्यांचा मृत्यू झाला. काठेके हे जन्मत: मुके होते.
घरातील एकमेव कमावती व्यक्ती गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, एक विवाहित मुलगा, पत्नी असा परिवार आहे.
मृत भागवत काठोके यांच्या कुटुंबाला राज्य शासनाने त्वरीत आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली.